आमचे सरकार विकासकामांद्वारे राज्याला पुढे नेण्याचे काम करणार : आदित्य ठाकरे

aaditya

कल्याण : कल्याणमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पत्री पुलाचा गर्डर बसवण्यास अखेर सुरुवात झाली आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्री पुलाच्या कामाला आता वेग येण्याची शक्यता आहे. गर्डर बसवण्याच्या कामासाठी आज आणि उद्या (शनिवार 21 नोव्हेंबर आणि रविवार 22 नोव्हेंबर) मध्य रेल्वेवर चार तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.

विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणमध्ये आले होते. कल्याण डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा मोठा प्रश्न होता. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

रेल्वेकडून मेगाब्लॉक मिळाल्यानंतर पत्रीपुलाचे गर्डरचे काम सुरू झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची कामे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विकासाच्या कामांनी वेग घेतला असून आम्ही राजकारण निवडणुकीपुरता करतो असे सांगत भाजपवर टीका केली.

दरम्यान, गेल्या २ वर्षांपासून पत्रीपुलाचे काम सुरू असून लोकांनी दाखवलेल्या या संयमाचे कौतुक करत अनेक अडचणींवर मात करून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आणखी महिन्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या