‘आपलं सरकार हे जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध’

donald trump

वॉशिंग्टन : वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरुन उडालेला हा भडका आता थेट अमेरिकेची सूत्र हातळल्या जाणाऱ्या व्हाईट हाऊसपर्यंत येऊन पोहोचला आहे. जवळपास ३० हून अधिक शहरांमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसच्याच बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज़ॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूप्रकरणी अखेर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपलं सरकार हे जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक राष्ट्राध्यक्ष म्हणून आपली भूमिका अधोरेखित करत त्यांनी अमेरिकेतील नागरिक आणि या देशाचं रक्षण करणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे असं देखील त्यांनी म्हटलं.

दरम्यान, नुकताच ट्रम्प यांनी एक जून रोजी राज्यांच्या राज्यपालांसह व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यास सांगितले. आंदोलन मोडून काढून आंदोलकांना तुरुंगात डांबायला हवे. हे जर करता येत नसेल तर तु्म्ही वेळेचा अपव्यय करत आहात, असेही ट्रम्प यांनी म्हटले.

सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान काळाच्या पडद्याआड…

‘इवांका ट्रम्प’ विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

आम आदमी पार्टीचे उद्या राज्यभरात ‘वीजबिल माफ करा’आंदोलन