fbpx

आमचा संघर्ष थेट बारामतीकरांशी: रणजितसिंह नाईक निंबाळकर

टीम महाराष्ट्र देशा:नुकताच भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आमचा संघर्ष थेट बारामतीकरांशी आहे. आम्हाला समानतेची वागणूक मिळाली नाही. ते पुढे बोलताना म्हणाले,माढा लोकसभा मतदारसंघात ज्या हालचाली होत आहेत त्यात लढवय्याची भूमिका माझी होती. कृष्णा खोऱ्याच्या स्थापणेनंतर पाणी आमच्या बॉर्डरवर आलं आहे. बारामतीकरांची इच्छा नव्हती म्हणून आमच्याकडे रेल्वे धावली नाही, अशा कठोर शब्दांत त्यांनी पवारांना लक्ष्य केलं आहे

रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपतर्फे माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्याशी होणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. माढा लोकसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध निंबाळकर ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे.