fbpx

‘बारामतीत भाजची ताकद थोडीशी कमी पडली, नाहीतर विजय पक्का असता’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. जनतेने पुन्हा एकदा भाजप सरकारला निवडले असून देशाच्या प्रतिनिधित्वाची धुरा नरेंद्र मोदी यांच्या हातात दिली आहे. तर देशा सह राज्यात देखील भाजप आणि मित्रपक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र काही प्रतिष्ठेच्या लढाई मध्ये भाजपला अपयश आल आहे. बारामती या पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याबाबत भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी खंत व्यक्त केली आहे.

आज गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गिरीश बापट म्हणाले की, बारामतीत आमची ताकद थोडीशी कमी पडली नाहीतर कांचन कुल या सहज विजयी झाल्या असत्या. तसेच यावेळी बापटांनी पार्थ पवारांच्या पराभवावर देखील टोला मारला. बापट म्हणाले की, ज्या उमेदवाराला राजकीय परिपक्वता नसते तो कुणाचा मुलगा किंवा नातू आहे म्हणून त्याला निवडून द्यायचे हे काही बरोबर नाही.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेना पाडण्याचा चंग भाजप नेत्यांनी बांधला होता. मात्र हे प्रत्यक्षात भाजपला शक्य झाले नाही. उलट भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना १५४९९४ मतांनी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. तर सुप्रिया सुळे यांना बारामतीच्या जनतेने ६८३७०५ मत देत विजयी केले.