पुण्यातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी देणे आमचे कर्तव्य – बापट

another-controversial-statement-by-pune-guardian-minister-girish-bapat

टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या पुण्याची लोकसंख्या लक्षात घेता भामा आसखेडवरून ३ ते ४ टीएमसी पाणी आणण्याचे काम सुरु आहे. आजवर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच प्रश्न कायम होता, तो सोडवण्यासाठी पुणे महापालिकेने २०० कोटी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने १५० कोटी रुपये बजेटमध्ये ठेवलेले आहेत. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपयांचं पॅकेज ठरवण्यात आलं असून त्यांनी देखील सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, पुण्यातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी देणे आमचे कर्तव्य आहे, अशी ग्वाही पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी दिली आहे.

‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये गिरीश बापट यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला आहे, तसेच जनतेने खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर दिल्लीतील भाजप सरकारच्या माध्यमातून शहराचा सर्वागीण विकास साधण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. नगररोडच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाघोलीमध्ये २५ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली असून, पीएमआरडीच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट

विरोधकांनी दहा वर्षे मेट्रोचा एक खड्डा देखील खोदला नाही. त्यामुळे ज्यांना पुण्यात मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये. असा टोला गिरीश बापट यांनी यावेळी लगावला आहे. पुण्यात मेट्रो अंडरग्राउंड करायची की ओव्हरहेड याच्यावरच कॉंग्रेस सरकारने आठ ते दहा वर्ष घालवली, आमचा निर्णय झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करत मेट्रोचे काम सुरु झाले,

शहरात तीन मार्गाची उभारणी सरकारकडून केली जात आहे. पुढे सिंहगडरोड, वाघोली, कात्रजपर्यंत मेट्रो सुरु करण्याचा सरकारचा विचार असून मेट्रो संदर्भात विरोधकांकडून केले जाणारे आरोप खोटे आहेत, पुणेकरांना पुढील १०० वर्षे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पडणार नाही, अशी मेट्रो उभारण्यात येत असल्याचं बापट यांनी सांगितले आहे.Loading…
Loading...