मनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होतो आहे- जितेंद्र आव्हाड

मनुवाद्यांमुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान होतो आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.  वैभव राऊतला पकडल्यावर त्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. उद्या असेच मोर्चे जर मुस्लिम बांधवांनी काढले आणि त्यात ‘देशका नेता कैसा हो’ सारख्या घोषणा दिल्या तर? हे असे होणार असेल तर आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांची भूमिका मांडली आहे. मनुवादी लोक हिंदूंना बदनाम करत आहेत. शिव्या देणे, दुसऱ्यांवर आरोप करणे ही यांची संस्कृती आहे. पारंपारिक हिंदू संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम हे लोक करत आहेत. यांच्यामुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.