आमची युती ओवेसींसोबत; महाराष्ट्रातील नेत्यांशी नाही : आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत फुट पडली आहे. एमआयएम पक्ष स्वबळावर लढणार आहे. याबाबतची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपला मान राखला नाही असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठ विधान केले आहे. त्यांनी आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी झालेली नाही. आमची युती एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसं हैद्राबादवरून आमच्याकडं आली आणि ते आता ओवेसींकडे निरोप घेऊन गेले आहेत. ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.

तसेच याविषयी बोलताना जलील यांनी आम्हाला खूपच कमी जागा दिल्या जात होत्या. आम्ही बराच काळ वाट पाहिली. वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला, मात्र आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही. त्यामुळे अखेर आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘असदुद्दीन ओवेसी यांना युतीबाबत मेल करण्यात आला होता. तो मेल मिळाल्यानंतर त्यांनी युतीबाबत काय भूमिका घ्याची याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर आम्ही तातडीने प्रसिद्धीपत्रक काढून आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कुणाला मान्य करायची असेल तर करावी नसेल करायची तर करू नये असंही जलील यांनी स्पष्ट केले आहे.