आमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार

blank

टीम महाराष्ट्र देशा : मशिदीवरचे भोंगे यापुढे चालणार नाहीत.अशी सक्त ताकीद राज ठाकरे यांनी दिली आहे.राज म्हणाले की आमची ‘आरती ‘ त्रास देत नाही; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार? यापुढे आम्हाला तुमचे भोंगे चालणार नाहीत,अशा स्पष्ट शब्दात राज ठाकरे यांनी मुसलमान धर्मियांना ताकीद दिली आहे.

भविष्यात जर भारत – पाक युद्ध झाले तर भारतीय सेनेला युद्ध हे पाक सोबत नाही तर या अर्तंगत ‘मोह्ल्यां’सोबत करावे लागेल.दिवसेंदिवस ‘ या ‘ लोकांची संख्या वाढत चालली आहे हे मला नकोय असंही राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत.

काही दिवसापासून मनसे बदलणार आहे याचे संकेत मिळत होते.आज दि.२३ जानेवारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून ‘ मराठी ‘ बाण्यासाठी लढणारी मनसे आता ‘ हिंदुत्ववादी ‘ झाली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदललेल्या अंदाजात आज अगदी रुपात समोर आली आहे.झेंड्यात बदल तर केलाच आहे.पण आता विचारधारेत सुद्धा बदल झालेला दिसून आला.