…अन्यथा राजकारणातून सन्यास घेईल – अमरसिंह पंडित

टीम महाराष्ट्र देशा : बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाली आहे. बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी अमरसिंह पंडित यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. पंडित यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांनी धमकी दिल्याचे तर पंडित यांनी खंडणी मागितल्याचेा आरोप डॉ. नरहरी शेळके यांनी केला आहे.

दरम्यान, शेळके यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तक्रारीला आणि दबावाला मी घाबरणार नाही, जनसामान्यातील माझी प्रतिमा डागाळण्याचा हा कुटील डाव आहे, शेळकेंचा बोलविता धनी कोण?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात दोषी आढळल्यास राजकीय जीवनातून संन्यास घेईल, अस अमरसिंह पंडित यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

तीनच महिन्यांपूर्वी पंडित यांनी शेळके यांच्याविरोधात केरोसिन परवाना अनियमिततेविरोधात तक्रार केली होती. त्याची चौकशी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर प्रलंबित आहे.