अन्यथा आम्ही बाहेरून पाठींबा देऊ, खातेवाटपावरून कॉंग्रेसने दिला शिवसेनेला इशारा

mahavikas aghadi

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊनही आघाडीत खाते वाटपावरुन अजूनही महाविकास आघाडीच घोंगड भिजत पडलं आहे. त्यामुळे आघाडीत काहीही आलबेल नसल्याचं दिसत आहे. महाआघाडीत सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या तीन खात्यांवरुन एकमत झाले नसल्याने तिन्ही पक्षांमध्ये अजूनही घासाघीस सुरुच आहे.

तर ही तीन खाती वगळता जवळपास सर्व खात्यांवर सहमती झाली आहे. मात्र जर या तीन खात्यांचे योग्य वाटप होत नसल्यास आणि दुय्यम स्थानाची खाती काँग्रेसच्या वाटयाल येत असतील, तर सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांचा शपथविधी होऊन १४ दिवस उलटले, तरी खातेवाटप जाहीर न झाल्याने ठाकरे सरकारला टीकांचा सामना करावा लागत आहे. त्यातच शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती असतील, तर राष्ट्रवादीकडे गृहनिर्माण खाते आणि अर्थ खाते असतील, अशी माहिती खात्रीलायक एबीपी माझा वृत्तवाहिनीला सूत्रांकडून मिळाली आहे.

अशातच महाविकास आघाडीत आता नवीन फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला १५ मंत्रिपदं, राष्ट्रवादीला १६ मंत्रीपदं, तर काँग्रेसला १३ मंत्रीपदं मिळणार आहेत. यामध्ये काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदही देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :