पंजाब : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. मात्र, असे असले तरी राज्यातील नागरिक कोरोनाबाबत अद्याप सावध झालेले दिसत नाही.
दरम्यान कोरोना लस घ्या अन्यथा कोरोना झाल्यास राज्य सरकार तुमच्या उपचाराचा खर्च करणार नसल्याचं पंजाब सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. पंजाब सरकारच्या या धोरणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधित लस घेणं बंधनकारक झालं आहे.
कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना 19 फेब्रुवारीची मूदत देण्यात आली होती आता ती मुदत वाढवून 25 फेब्रुवारी करण्यात आली आहे. यानंतरही कोणी आरोग्य कर्मचारी लस घ्यायची राहिल्यास आणि त्याला कोरोना झाल्यास सरकार त्याच्यावर कोणताही खर्च करणार नाही, असं पंजाब सरकारने म्हटलंय.
लस न घेतलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्यामुळे कोणतीही सुट्टी मिळणार नाही. पंजाब सरकारने हा निर्णय घेण्यामागे महत्वाचं कारण आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री बलबिंदर सिंह सिद्धू यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- हिंगोली जिल्ह्यात संसर्ग वाढला; मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार कोविड केंद्र
- अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; नवीन वाहतूक नियम धाब्यावर
- सासरच्या छळाला कंटाळून विवाविहतेची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल
- पनवेलमध्ये मायलेकीचा खून करून फरार झालेल्या आरोपीची हिंगोलीत आत्महत्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; ५१५ नव्या रुग्णांची भर, ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू