…अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ‘त्या’ सिनेमाचा सेट उधळून लावणार

rakesh kamthe vs nagraj manjule

टीम महाराष्ट्र देशा: नागराज मंजुळेंवर मेहेरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे .शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी विद्यापीठाला २४ तासांचा अल्टीमेटम दिला असून सेट उभारण्याचे काम त्वरित न थांबविल्यास आम्ही सेट उधळून लाऊ असा थेट इशारा विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे .

सैराट चित्रपटामुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेले तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे शुटींग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मैदानात होणार असून त्यासाठी केवळ साडेसहा लाख रूपयांचे शुल्क आकारून हे मैदान तब्बल दीड महिन्यांसाठी भाड्याने देण्यात आले आहे. दरम्यान या मैदानावर सेट उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी जेसीबी मशिनच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. यामुळे सर्व मैदानाचे विद्रुपीकरण झाले असून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नसल्याचा आरोप विद्यार्थांनी केला आहे.

Loading...

विशेष म्हणजे सेट उभारणीचे काम सुरू असल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मैदानात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी येऊ नये म्हणून चक्क ‘नो एंट्री’ चा बोर्ड लावला आहे. यासर्व प्रकारामुळे विद्यापीठाचा मनमानी कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी खेळायचे कुठे? विद्यापीठ प्रशासनाचा सेट उभारण्यांच्या कारभारावर नियंत्रण नाही का? विद्यापीठांकडे पैशांची कमी आहे का? मंजुळे हे माजी विद्यार्थी असल्याने त्यांना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात येत आहे का? असे असंख्य प्रश्न विद्यार्थांनी उपस्थित केले आहेत.

आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे .शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी विद्यापीठाला २४ तासांचा अल्टीमेटम दिला असून सेट उभारण्याचे काम त्वरित न थांबविल्यास आम्ही सेट उधळून लाऊ असा थेट इशारा विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. आमचा नागराज मंजुळे यांना विरोध नसून विद्यार्थ्यांच्या तसेच खेळाडूंच्या होणाऱ्या गैरसोयीला विद्यापीठ कारणीभूत आहे आम्ही त्याविरोधात आवाज उठवत आहोत असे स्पष्ट केले . विद्यापीठाने मैदान भाड्याने देताना खेळाडूंचा विचार का केला नाही तसेच विद्यापीठाने ताबडतोब पर्यायी व्यवस्था का उपलब्ध करून दिली नाही असा सवाल कामठे यांनी उपस्थित केला आहे .

दरम्यान इतर संघटना देखील विद्यार्थ्यांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एकत्र येण्याची तयारी सुरु आहे.अभाविप ,एन एस यु आय ,आदी संघटना आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...तर भारतातील ४० कोटी लोकांना होऊ शकते कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
नांगरे पाटील 'अॅक्शन मोड'मध्ये, आता बाहेर पडूनच दाखवा
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारत कोरोनाच्या स्टेज-३मध्ये गेला असण्याची शक्यता: कोरोना टास्क फोर्स संयोजक डॉक्टरचा दावा
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
भारताचा मित्र असलेल्या ‘या’ राष्ट्रात चीनपेक्षा जास्त लोकांना झालाय संसर्ग
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती