अन्यथा शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील- खासदार राजू शेट्टी

Raju Shetty news

टीम महाराष्ट्र देशा: खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकारातून स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीड पट हमी भावा द्यावा, शेतकऱ्यांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा अशी मागणी करणारे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. भाजपाने सत्तेमध्ये येताना शेतकऱ्यांना जी आश्वासने दिलेली होती, ती अद्यप पाळलेली नाहीत. तो शब्द त्यांनी पूर्ण करावा. अन्यथा हेच शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील. असा इशा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती दिल्लीत संसद भवन येथे १९३ शेतकरी संघटनांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार शेट्टी यांच्या वतीने देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यासंदर्भात शेतकरी संघटना तसेच शेट्टी यांच्या हालचाली सुरू होत्या. यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवार, खा. अरविंद सावंत, खा. शरद यादव, खा. नरेंद्रकुमार, जयप्रकाश यादव, माजी खा. दिनेश त्रिवेदी, कृषिमूल्य आयोगचे माजी अध्यक्ष टी हक, दीपेंद्रसिंग हुडा, जयंत चौधरी उपस्थित होते.

काय म्हणाले राजू शेट्टी ?

देशभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या विधेयकाच्या मंजुरीसाठी ठराव करण्याचा निर्णय झाला. तसेच या सर्व ठरावाच्या प्रति राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांना पाठवल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संपूर्ण देशभर रान उठवण्यात येईल. १० मे रोजी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाला १६१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचे औचित्य साधून देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निदर्शने करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.