…नाहीतर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल; शिवसेनेने भाजपला फटकारले

Otherwise, sleeping tablets have to be eaten; Shivsena shouted the BJP

मुंबई : देशात १४ ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपला चांगलाच फटका बसला. ‘आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी त्या आभासातून लवकरात लवकर बाहेर पडावे. नाहीतर मानसिक आजाराचे मनोरुग्ण म्हणून आयुष्यभर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल.’ असे फटकारे आजच्या सामानातून भाजपवर ओढण्यात आले आहेत.

वाचा सामनाचा अग्रलेख…

Loading...

 यापुढील पन्नास वर्षे फक्त भाजपचेच राज्य राहील असा समज निर्माण करण्यात आला आहे व तसा प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील हकिकत वेगळी आहे व प्रत्येक पोटनिवडणुकीत मोदी किंवा भाजपची लोकप्रियता सपाटून मार खात आहे. आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी त्या आभासातून लवकरात लवकर बाहेर पडावे. नाहीतर मानसिक आजाराचे मनोरुग्ण म्हणून आयुष्यभर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल.

देशभरातील पोटनिवडणुकांचे निकाल लागले, जय पराजयाचा शिमगा झाला. पण कवित्व उरले आहे. २०१९ साली लोकसभेच्या ४०० जागा स्वबळावर जिंकण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात तर अमित शहा हे स्वदेशात फिरत आहेत. देशातले वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे व पुन्हा मोदी यांच्याच नेतृत्वाखाली दिल्लीचे राज्य येईल, असे स्वप्न या मंडळींना पडले आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय, गरिबीरेषेखालील जनता मोदी राजवट आल्यापासून इतकी सुखात आहे की त्या सुखाचे अजीर्ण होऊ नये म्हणून सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव भरमसाट वाढवून ठेवले. यापुढील पन्नास वर्षे फक्त भाजपचेच राज्य राहील असा समज निर्माण करण्यात आला आहे व तसा प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील हकिकत वेगळी आहे व प्रत्येक पोटनिवडणुकीत मोदी किंवा भाजपची लोकप्रियता सपाटून मार खात आहे. अगदी पालघर किंवा भंडारा-गोंदियाचेच उदाहरण पहा. २०१४ मध्ये या दोन्ही जागा भाजपने पन्नास टक्क्यांवर मताधिक्य मिळवून जिंकल्या होत्या. म्हणजे विजय हा निर्विवादच म्हणावा लागेल. मात्र आता दोन्ही ठिकाणी भाजपचे मतदान किमान ८ ते १० टक्क्यांनी घसरले.

हे चित्रलोकप्रियतेचा बाण वर जात असल्याचे नक्कीच नाही. कैराना लोकसभा मतदारसंघ भाजपने २०१४ साली ५१ टक्के मते मिळवून जिंकला होता. आता तेथे दारुण पराभव झाला व भाजपचे मताधिक्यही प्रचंड घसरले. निवडणुकांत हार-जीत होतच असते. मात्र सर्व विरोधक एकत्र आल्याने त्यांची मते वाढली व पराभव झाला, पण आमचा मतांचा आकडा किंवा टक्का कायम राहिला असे अभिमानाने सांगता येईल अशीही परिस्थिती भाजपची राहिलेली नाही. ज्या पालघरमध्ये चारेक लाखांच्या मताधिक्याने भाजप २०१४ साली विजयी झाला तेथे संपूर्ण सरकार मैदानात उतरूनही जेमतेम २०-२५ हजारांचे मताधिक्य मिळाले. पुन्हा त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी ज्या खटपटी, लटपटी केल्या त्या महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणाऱ्या नाहीत. कैरानाची निवडणूक हातची जात आहे हे लक्षात येताच तेथे हिंदू-मुस्लिम वादाचा भडका उडवून दिला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील महंमद अली जीनांच्या फोटोवरून वाद निर्माण केला व त्या वादाचे रूपांतर दंगलीत होऊन त्याचा कैराना निवडणुकीत प्रभाव पडेल असे पाहिले, पण प्रत्यक्षात ‘गन्ना’ (ऊस) विरुद्ध ‘जीना’ हे नाटय़ रंगले नाही व कैरानातील हिंदू मतदारांनीहीभाजपविरोधात मतदान केले व तेथे दिवंगत खासदारांची कन्या उमेदवार असतानाही विजयी होऊ शकली नाही.

कैरानात २०१४ साली ५२ टक्के मतदान होते ते दहा टक्क्यांनी खाली आले. निवडणुकीत अर्धा टक्का मतांचा फरकही देशाचा निर्णय बदलत असतो. ४०० जागांचे स्वप्न स्वबळावर पाहणाऱ्या भाजपचे मतदान ८ ते १० टक्क्यांनी घसरले आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे हे लक्षण नाही. मतांसाठी जीनांचा वापर करण्यापेक्षा या मंडळींनी वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली असती तर समस्त हिंदू मतदार भाजपच्या मागे ठाम उभा राहिला असता. पण मतांसाठी यांना जीना व पाकिस्तान लागते तेवढे वीर सावरकर लागत नाहीत. जीनांचा पाकिस्तानी रुपया कैरानात चालला नाही व भाजपचा पराभव तेथेही झाला. उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यातील हा तिसरा पराभव आहे. गोरखपूर, फुलपूर व आता कैराना. बसपा व समाजवादी पार्टी एकत्र आल्यामुळे भाजपचा पराभव झाला हे मान्य, पण तुमचा स्वतःचा जनाधार ज्या उत्तर प्रदेशात पन्नास टक्के होता तो घसरून हिंदुस्थानी रुपयाप्रमाणे एकदम लुडकला आहे. आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी त्या आभासातून लवकरात लवकर बाहेर पडावे. नाहीतर मानसिक आजाराचे मनोरुग्ण म्हणून आयुष्यभर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले