भाजपसोबत युती झाली नाही तर शिवसेनेत उभी फूट पडेल – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली नाही, तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केल आहे.

गेले अनेक वर्ष एकमेकांच्या सोबतच निवडणूक लढवणाऱ्या दोन्ही पक्षांनी युती करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, जर शिवसेनेने युती करण्याचं नाकारलं तर शिवसेनेचे अनेक आमदार पक्षाची साथ सोडतील, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भाजपसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांची असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.

You might also like
Comments
Loading...