आंदोलन थांबले नाहीतर, इट का जवाब पथर से देंगे

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना इशारा

कोल्हापूर : ‘‘आंदोलन करण्यास लाखभर लोक लागत नाहीत, दगड भिरकावला की आंदोलन होते. मात्र कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. जर आंदोलन थांबले नाहीतर, इट का जवाब पथर से देंगे, असा इशारा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर येथे दिला. कृषी क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची खासदार राजू शेट्टी यांची हिम्मत नसल्याचा टोला कृषी राज्यमंत्री

सदाभाऊ खोत यांनी यावेळी लगावला. या वेळी खोत म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांत कधी एफआरपीसाठी आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही. सध्या उद्योग अडचणीत असून सरकार प्रयत्न करत आहे. मात्र आम्हाला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या काही नेत्यांनी घेतेली होती. कारण हे नेते निवडणुकीवर डोळा ठेवून वाटचाल करत आहेत. त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे.’’

साखर कारखान्यांनी एफआरपीमध्ये मोडतोड करून ८०-२० असा फॉर्म्युला वापरून ऊस बिले जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला आहे. ज्या कारखान्यांनी पैसे जमा केले आहेत, त्या कारखान्यांवर आणि गट कार्यालयावर संघटनेने हल्लाबोल सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

You might also like
Comments
Loading...