…तर मी राजकारण सोडून देईन : डॉ. सुजय विखे

अहमदनगर / स्वप्नील भालेराव : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ १५ वर्षापासून विकासकामांअभावी बंद पडला आहे. या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीस १५ वर्षापासून मतदारांनी पाहिलेच नाही. त्यामुळे विकास करण्याचा प्रश्नच येत नाही. यावेळी तुम्ही जी चूक केली आहे आता पुन्हा चूक करु नका, असे मत डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

खर्डा येथे जनसेवा फाउंडेशन व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज विळदघाट अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.सुजय विखे बोलत होते.

डॉ.विखे म्हणाले, दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा विकासकामाअभावी बंद पडला आहे. कारण गेल्या १५ वर्षापासून या दक्षिण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी कोणी ही पाहिलाच नाही. त्यामुळे विकासकामे होण्याचा प्रश्नच येत नाही. अशी खासदार दिलीप गांधी यांचे नाव न घेता टीका केली.

तालुक्यातील व भागातील अहमदनगरचा दक्षिण मतदारसंघातील जनतेनी जी चूक केली आहे ती पुन्हा करु नका. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जोरदार चर्चा आहे. परंतु ते मी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूकीस उभा राहणाऱ्या उमेदवाराने वचननामा तयार करून निवडणूक लढविली पाहिजे, मी वचननामा तयार करून जनतेसमोर निवडणूक लढविणार आहे. यापैकी ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले नाही तर मी राजकारण सोडून देईन, असेही डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...