‘काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस निलंबित करा अन्यथा मी सोलापुरात जाऊन आंदोलन करेन’

टीम महाराष्ट्र देशा : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करावयास सोलापूरात आले होते. त्यावेळी जनतेने सरकारच्या विरोधात निदर्शने केली पण पोलिसांनी अत्यंत निष्ठुरपणे निदर्शने करणाऱ्याना लाथा बुक्यांनी मारहाण केली. निषेध व्यक्त करणाऱ्या आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलिस प्रशासनावर आता सर्वच स्तरातून टीका होते आहे.

दडपशाही करणाऱ्या पोलिसांना निलंबित केले नाही, तर सोलापुरात जाऊन आंदोलन करेन, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील नेमके काय म्हणाले?

“मोदींसमोर निदर्शने केली म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असते, तर समजू शकलो असतो. पण त्यांना अमानुष पद्धतीने लाथांनी तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करणारे पोलीस निलंबित झाले नाही तर मी सोलापुरात जाऊन आंदोलन करेन.”

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. “सगळ्यांचा हिशोब होणार, सूद समेत वापस करेंगे” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पोलिस प्रशासनासह राज्य सरकारला गर्भित इशारा ट्वीट करून दिला आहे.

दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी काल देखील सोलापुरात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला होता. प्रणिती शिंदे यांनी आपल्या ट्वीटर वरून सरकारला ‘आम्ही सरकार विरोधात आंदोलन देखील करू शकत नाही का?’ असा प्रश्न विचारला आहे.

You might also like
Comments
Loading...