‘…अन्यथा संघाच्या नावातून हैदराबाद काढून टाकावे’, माजी मंत्र्याची सनरायझर्स हैदाराबादला धमकी

हैद्राबाद

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल २०२१ चा थरार पाहायला मिळू शकतो. याच पार्श्वभमीवर १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेचा लिलाव पार पडला.

या लिलावात डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदाराबाद संघाने सर्वात कमी खेळाडू खरेदी केले. त्यातही त्यांनी एकाही स्थानिक खेळाडूची निवड केली नाही. यानंतर स्थानिक खेळाडूंना दुर्लक्षित केल्याने हैदराबाद संघ मोठ्या विवादात अडकला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र यांनी लिलावाच्या समाप्तीनंतर हैदराबाद संघाला चेतावणी दिली आहे.

नागेंद्र यांनी हैदराबाद संघाच्या मालकांना आणि संघ व्यवस्थापकांना धमकावले आहे. तसेच हैदराबादमधून एकाही स्थानिक खेळाडूला संधी न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “सनरायजर्स हैदराबाद संघात स्थानिक खेळाडूंना स्थान नाही मिळाले, ही खूप निराशाजनक बाब आहे. इथे कौशल्यवान खेळाडूंची कमतरता नाही. हैदराबाद संघाला स्थानिक खेळाडूला संधी द्यावी लागेल अन्य़था संघाच्या नावातून हैदराबाद काढून टाकावे लागेल.”

महत्वाच्या बातम्या