…अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात फटाके फोडू, मनसेचा प्रशासनाला इशारा

…अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात फटाके फोडू, मनसेचा प्रशासनाला इशारा

mns

औरंगाबाद : शहरातील व्हीआयपी रोड आणि बीड बायपास रोड इतकेच नाही तर शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था दिवाळी आधी सुधारा अन्यथा मनसे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके फोडून आंदोलन करेल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

जळगाव रोडच्या दुरावस्थेबाबत मनसेच्या वतीने सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात भ्रष्ट अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालत मनसेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र, तरी देखील प्रशासनाच्या वतीने यावर काेणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. अखेर मनसेच्या वतीने प्रशासनाला दिवाळीपर्यंतचा वेळ देण्यात आला असून त्या नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात मनसेच्या इशाऱ्या नंतर  व्हीआयपी रोडवरील वरील रस्ता दुरुस्तीचे काम येत्या काही दिवसात सुरू होईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अभियंता उकिर्डे यांचा दिले असल्याचे सुहास दाशरथे यांनी सांगितले आहे. या वेळी अॅड. राज कल्याणकर, विशाल विराळे, संदीप कुलकर्णी,  युवराज गवई, निरज बरेजा, किरण गवई, बाबुराव जाधव, अविनाश पोफळे, राहुल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या