‘..अन्यथा नागरिकांना पर्यटनस्थळी सुरक्षेसाठी शस्त्र घेऊन जावे लागेल’, भाजपाचा इशारा

मुंबई : कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि तरुणींना बेदम मारहाण केली. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत सात ते आठ जणांनी चौघांना मारहाण केली. याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या पीडित तरुणींची पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘मलंगगडावर तरूण तरूणींवर झालेला हल्ला विनयभंग याचा निषेधचं. नेवाळे पोलीस ठाण्यात गेल्यावर तिथल्या पोलिसांनी दखल न घेणं हे दुदैवी आहे. याची चौकशी व्हायला हवी. समाजकंटकावर कारवाई करत वेळीच आवर घालावा. अन्यथा नागरिकांना पर्यटनस्थळी देखील स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊन जावे लागेल’ असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

रविवारी, दि.१ ऑगस्ट रोजी संबंधित युवक-युवती कल्याण परिसरातील मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी काही टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा कारण करत या चौघांना बेदम मारहाण केली. आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या