उत्तर भारतीय लोक मुंबईला महान बनवतात – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा: उत्तर भारतीय तसेच इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवत असल्याच वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईमधील घाटकोपरच्या शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या चौकाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. काही लोक मुंबईत उत्तर भारतीयांना निशाणा बनवत आहेत. त्यांना उत्तर देण्यास आम्ही सक्षम असून अशा लोकांवर कारवाई करत असल्याचही त्यांनी सांगितल आहे. तसेच आम्हाला मराठीचा अभिमान आहे मात्र राजकारणासाठी कोणी भाषेचा वाद निर्माण करू नये अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसेवर केली आहे

Loading...

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुंबईत मनसे आक्रमक झाली आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणी मनसे कार्यकर्त्याकडून अनधिकृत फेरीवाले आणि उत्तर भारतीयां विरोधात खळखट्याक आंदोलन केलं जात आहे. दरम्यान आता फेरीवाल्यांकडूनही मनसैनिकांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेळ्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होवू शकतोLoading…


Loading…

Loading...