fbpx

उस्मानाबाद लोकसभेसाठी युवा उद्योजक देवदत्त मोरे इछुक !

तुळजापूर –उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा येथील युवा उधोजक देवदत्त मोरे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मिळेल त्या पक्षाकडून अन्यथा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला असुन त्यादृष्टीने ते सध्या जिल्हयात मतदारांशी संपर्क साधत आहेत .

देवदत्त मोरे यांनी दत्त्त मोरे फाऊंडेशन माध्यमातुन दुष्काळ परिषद विविध गावामध्ये सोयी सोयी उपलब्ध करुन देत त्या माध्यमातून ते मतदारांशी संपर्क साधत आहेत .

तडवळा येथील युवा उद्योजक असलेले मोरे यांनी मागील एक वर्षापासून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी विविध कार्यक्रमाचा माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत .

देवदत्त मोरे यांनी खास करुन शिवसेनेकडून उमेदवारी मागीतली असुन त्यादृष्टीने ते आपल्या हितचिंतका मार्फत उध्दव ठाकरेपर्यंत पोहचल्याचे वृत्त आहे. माञ मातोश्रीवरुन त्यांना अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेने नाही दिला तर उर्वरीत राज्यस्तरीय पक्षाकढून लढणार असल्याचे वृत्त आहे. माञ सध्या तरी त्यांच्याकडे अपेक्षित मतदारांचा ओढा दिसत नसल्याने पक्षाने उमेदवारी दिली तरच ते स्पर्धेत येवु शकतात अन्यथा त्यांची उमेदवारी ऐखाद्या पक्षाच्या उमेदवाराचे मते खावु शकतात ऐवढीच मर्यादित त्यांची शक्ती आहे.