उस्मानाबाद लोकसभा : वाचा कोणता पक्ष, कोणता उमेदवार?

उस्मानाबाद : (प्रवीण डोके) लोकसभेसाठी सध्या सर्वच पक्ष्याची जिल्ह्यात जोरदार तयारी असल्याचे पाहवयास मिळत आहे. प्रत्येक पक्षामध्ये नेत्यांची भाऊगर्दी वाढली आहे. अनेक नेत्यांनी घुडग्याला बाशींग बांधले आहे. युती आणि आघडी होणार की नाही त्यावर अजून ही बराच खल चालू आहे. आघाडीच्या जागा वाटपांचा तिढा सुटलेला पाहवयास मिळत आहे. कुठल्या पक्षाकडून कोणाची वर्णी लागू शकते, कोण कोणाला डोईजड होईल हा थोडक्यात आढावा.

उस्मानाबाद लोकसभेला जिल्ह्यात राष्ट्रवादी-काँग्रेस, शिवसेने सोबतच काँग्रेसचीही मोठी ताकद जिल्ह्यात आहे. त्यासोबतच भाजपनेही जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्यालाच कसे तिकीट मिळेल, युती किंवा आघाडी झाली तरी आपल्याच पक्षाला जागा कशी सुटेल आणि आपल्यालाच तिकीट कसे मिळेल यासाठी इच्छुकांनी तगडी फिल्डींग लावली आहे.

राष्ट्रवादी-कॉंग्रेस
उमेदवार : उस्मानाबाद लोकसभेला सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पद्मसिंह पाटील हे उभा राहणार नसल्याने त्यांचा जागी नवीन उमेदारांची चाचपणी सध्या सुरु आहे. त्यामध्ये डॉ. पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.
परिस्तिथी : उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पद्मसिंह पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे समीकरण आहे. अनेक नवे चर्चेत असली तरी यावेळीही पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार असल्याचं चित्र सध्यातरी आहे.
राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यातच डॉ. पद्मसिंह पाटील हे त्यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपी आहेत. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. स्थानिक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेचा आणि कळीचा ठरतो. त्यामुळे यावेळी पक्षाश्रेष्टी वेगळा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

कॉंग्रेस-
उमेदवार : कॉंग्रेस पक्षाकडून शिवराज पाटील चाकूरकर हे एकमेव इच्छुक असल्याचे समजते आहे.
परिस्थिती : चाकूरकर यांनी स्वतः पत्रकार परिषदेत उल्लेख केला की काँग्रेस पक्षाने संधी दिली तर आपण लोकसभा लढवणार आहोत. या लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाची मागील एक वर्षातील पक्ष बांधणी, संघटन आणि दिशा पहिली तर पाटील यांच्या सूचक वक्तव्याला पूरक अशीच आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर या मतदार संघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉंग्रेसने सुद्धा जोरदार तयारी चालू केल्याचे कळते आहे. . शिवराज पाटील चाकूरकर सोडता इतर कोणी नेता लोकसभेसाठी इच्छूक असलेला अद्यापतरी दिसत नाही.

शिवसेना-
उमेदवार : शिवसेनेकडून विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड, उद्योजक शंकराव बोरकर, विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा सध्या चालू आहे.
परिस्थिती : शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवी गायकवाड यांनी पुन्हा लोकसभेची तयारी केली आहे. मात्र त्यांच्या नावापुढे मातोश्रीवरून हिरवा कंदील मिळणार का याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. दोन वेळा आमदार, एक वेळा खासदार अशी पदे त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार गायकवाड यांनी आवश्यक सुविधा न दिल्याने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कानशीलात लगावली होती. त्यामुळे त्यांना परत तिकीट मिळणार की नाही अद्याप स्पष्ट नाही.
दुसरीकडे शंकराव बोरकर यांनीही मातोश्रीवरून फिल्डिंग लावल्याचे समजते आहे. तर तानाजी सावंत यांनी साखर कारखाना, सामुदायिक विवाह सोहळा यामाध्यमातून आपला जम बसवला आहे .

भाजप-
उमेदवार : भाजपकडून परंडा येथील सध्याचे विधान परिषदेचे आमदार सुजितसिंग ठाकूर , बार्शीचे भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांची नावे चर्चेत आहेत.
परिस्थिती : भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी गेल्या चार वर्षात झालेल्या स्थानिक निवडणुकीत मोठं यश मिळवल आहे . भाजप पक्षाचे त्यांनी संघटनही वाढलं आहे. आमदार ठाकूर यांनी अनेक निवडणुकीत राजकीय चमत्कार दाखवत अनपेक्षितपणे विजयश्री खेचून आणला आहे. आमदार ठाकूर यांनी स्वतः लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर भाषणात सांगितल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना हुरूप आला असून त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

काय होऊ शकत ?

सध्यातरी राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवार आणि शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यातच हा सामना रंगणार असल्याचे बोलाल जात आहे.

विधानसभा मतदार संघ आणि बलाबल-
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये औसा, उमरगा, उस्मानाबाद,भूम-परंडा-वाशी, तुळजापूर , बार्शी हे विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये कॉंग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेनेचा एक आमदार असे बालाबल आहे.

You might also like
Comments
Loading...