fbpx

उस्मानाबाद लोकसभा : उद्योजक शंकरराव बोरकर ठरू शकतात ‘गेम चेंजर’

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेना नेते तथा प्रसिद्ध उद्योजक शंकरराव बोरकर यांना मातोश्रीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. गरीब कुटूंबातुन जन्माला येऊन साखर कारखान्याचे चेअरमन, यशस्वी उद्योजक जनमानसात स्वच्छ प्रतिमा असलेला, कुठल्याच गटातटाचा नसलेला चेहरा म्हणुन उस्मानाबाद लोकसभेला शंकरराव बोरकर यांचे नाव ताकतवान मानले जातेय, सर्व पदाधीका-यांचे त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे.

शंकरराव बोरकर हे 1985 पासून एकनिष्ठ शिवसैनिक असून ते मातोश्रीवरील खास नेत्यांपैकी ऐक आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील ते होते. तसेच ते तानाजी सावंत यांचे खास समर्थक आहेत. जिल्ह्यातील सर्व शिवसेना नेते, शिवसैनिक यांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध असून सध्या धाराशिव शिवसेना मध्ये या बातमीने उत्साह आला असून सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत.

विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्या बद्दल नाराजगी आहे आणि याचा फटका बसू नये म्हणून मातोश्री वर आता शंकरराव बोरकर यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, नेत्यांनी केली होती. आणि या मागणीवर उध्दव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तात्कालीन गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढलेले शंकरराव बोरकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासु शिवसैनीक म्हणुन त्यांची प्रतिमा जिल्ह्यात आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही नजरेत पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे.मराठवाड्यात शिवसेनेचा पहिला साखर कारखाना उभा करण्याचे श्रेय बोरकरांना जाते त्यामुळे शंकरराव बोरकरांची उमेद्वारी हि सर्व आव्हाने पेलणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात तगडी मानली जाते