उस्मानाबाद लोकसभेसाठी भाजपकडून ना.संभाजीराव पाटील निलंगेकर ?

निलंगा /प्रा.प्रदीप मुरमे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजप-सेनेची युती होण्याची शक्यता धूसर झाली आहे.शिवसेनेबरोबरच भाजपही स्वबळावर निवडणूका लढविण्याची भाषा करु लागल्याने राज्यात लोकसभेसाठी ‘युती’ न होण्याचे संकेत मिळत असून या मतदारसंघातून भाजपकडून कौशल्य विकास तथा कामगार मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचे समजते.

लोकसभा निवडणूकीसाठी युतीची शक्यता मावळल्याने सेना,भाजप हे दोन्ही पक्ष राज्यातील ४८ मतदारसंघातून सक्षम उमेदवार देण्याच्या जोरदार तयारीत आहेत.उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रा.रविंद्र गायकवाड हे विद्यमान खासदार आहेत.२०१४ च्या मोदी लाटेत प्रा.गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते डाँ.पद्मसिंह पाटील यांना पराभूत केल्याचे सर्वश्रूतच आहे.या मतदारसंघात शिवसेने बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.२०१४ मध्ये देशात भाजपची सत्ता आली असली तरी भाजपला माञ या मतदारसंघात आपली ताकद वाढविण्यात यश आले नाही.त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात २०१९ च्या निवडणूकीत ‘कमळ’ फुलविणे भाजपसाठी मोठे आव्हानात्मक काम आहे.शिवसेनेकडून प्रा.रविंद्र गायकवाड यांचीच उमेदवारी निश्चित असल्याचा दावा प्रा.गायकवाड यांचे समर्थक करतात.

Loading...

काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात हि जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते डाॅॅ.पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा तथा जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या नावाचाच राष्ट्रवादी गोटात जोरदार बोलबाला आहे.शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप उमेदवारीचा पत्ता उघड केला नसला तरी या पक्षाकडून निश्चित खमक्या उमेदवाराला या लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्यात येणार आहे हे माञ नक्की.या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याची जोरदार रणनिती भाजपकडून आखली जात आहे.आ.सुरजितसिंह ठाकूर वगळता भाजपकडे लोकसभेसाठी दावेदारी ठोकणारा दुसरा कोणताही उमेदवार आजतरी दृष्टीक्षेपात नाही.

त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठीचा उमेदवारीचा शोध लातूरचे पालकमंञी संभाजीराव पाटील यांच्या नावा समोर येवून थांबत आहे.निवडणूका लढविण्याचे तंञ अवगत असलेले संभाजीराव निवडून येण्याची क्षमता व पैसा या निकषात अगदी फिट बसतात.त्याचबरोबर राजकारणात आवश्यक असलेल्या साम,दाम,दंड,भेद या नितीचा अवलंब करण्यात संभाजीराव कमालीचे माहीर असल्याने या मतदारसंघात भाजप पक्षश्रेष्ठी संभाजीराव पाटील यांच्या रुपाने एक तगडा उमेदवार या लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याचे मनसुबे आखत असल्याची माहिती भाजप गोटातून ऐकावयास येते.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील ६८ गावांचा समावेश आहे.त्याचबरोबर उमरगा तालुका हा संभाजीराव यांचे आजोळ व वाशी तालुका संभाजीराव यांची सासरवाडी आहे.तर उस्मानाबाद मतदारसंघात संभाजीराव यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने संभाजीराव पाटील यांची उमेदवारी शिवसेना व राष्ट्रवादी समोर निश्चितच मोठे आव्हान उभे करु शकेल असे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे.एकुणच भाजपकडून संभाजीराव यांनी लोकसभेच्या या आखाड्यात उडी घेतल्यास शिवसेना,राष्ट्रवादी व भाजपमधील लोकसभेसाठीची ही राजकीय दंगल राज्यभर गाजणार म्हंटल्यास काही वावगे ठरणार नाही,हे माञ निश्चित !

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत