उस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य

उस्मानाबाद : लोकसभेचा जसजसा कालावधी जसा जसा जवळ येईल तशा पडद्यामागे हालचाली गतीमान होताना दिसत आहेत. उस्मानाबाद लोकसभेला उद्योगपती तथा नृसिंह कारखान्याचे चेअरमन शंकर बोरकर यांची मजबुत बांधणी सुरू असल्याचे दिसत आहे त्यांना मतदारसंघ नवा नाही त्यामुळे बोरकरांनी अगोदर सर्व बांधणी थेट मातोश्री वरून करण्याचे योजीले आहे असे समजते आहे.

Loading...

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा खुला असल्यामुळे तिथे इच्छुकांची गर्दी मोठी आहे. परंतु निवडणुक हि जिंकण्यासाठी असावी उभं राहण्यासाठी नसावी असा प्रत्येक पक्षाचा साधारणतः नियम असतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष तसा तगडा उमेदवार शोधताना दिसत आहेत.

भाजपा व सेना युतीचे काही खरे नसल्यामुळे प्रत्येक जण सावध पावले टाकत आहे. उस्मानाबाद लोकसभेमध्ये त्यांची दावेदारी भक्कम असण्याचे महत्वाचे कारण यावेळी जातीय समीकरणे निवडणुकीमध्ये उदयाला येणार हे निश्चित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बार्शी, लोहा, उमरगा या तालुक्यातील बोरकरांच्या पाठीमागे असलेला समाज, परंडा, कळंब, भुम, वाशी तालुक्यातील त्यांचे कार्य, उस्मानाबादमधील व उमरगा शिवसैनीकांची साथ आणि पक्षनेतृत्व उध्दव ठाकरे यांच्या सोबत असलेला निष्ठेचा समन्वय. या सगळ्या सोबत त्यांची प्रतिमा यामुळे बेरजेची मोट बांधणारा तगडा उमेद्वार म्हणुन शंकर तात्या बोरकर यांच्याकडे पाहिले जाते आहे.

शिवसेनेकडून ताकतवान, स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चेहरा म्हणुन शंकर (तात्या) बोरकर यांचे नाव प्रभावीपणे आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून कोणाला तिकीट मिळणार हा अजूनही अनुउत्तरीत प्रश्न असला तरी सर्व पातळीवर ताकतवान उमेद्वार म्हणुन शंकर (तात्या) बोरकर यांची दावेदारी मोठी मानली जात आहे. २०१४ ची मोदी लाट बर्यापैकी ओसरली असल्याचे चित्र सध्यातरी आहे. ४ राज्यांच्या निवडणुकीमुळे स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युती होवो किंवा न होवो उमेद्वार सर्वंकष हा निकष म्हटलं तर उद्योगपती शंकर तात्या बोरकरच योग्य अशी चर्चा आता उस्मानाबाद जिल्ह्यात सुरु आहे.

मराठवाडयामध्ये राजकारणात धोबीपछाड देण्यासाठी ‘हाबाडा ‘ हा शब्द परिचीत आहे त्यामुळे तात्या नावाने परिचीत असणारे एक व्हिजन असणारे नेतृत्व कुणाला हाबाडा देणार ? हे येणारा काळ ठरवेल.Loading…


Loading…

Loading...