fbpx

उस्मानाबाद लोकसभा : अर्चना ताई विरुद्ध रवी सर?

टीम महाराष्ट्र देशा : (प्रवीण डोके) आगामी लोकसभेला उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा तथा राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्यात सरळ सरळ लढत होणार असल्याची समजते आहे.

राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडी झाल्याने उस्मानाबाद लोकसभेला आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादी-कॉंग्रेस असल्याने जेष्ठ नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या जागी कोणाला तिकीट द्यायचे हे अद्याप ही गुलदस्त्यात आहे. परंतु जेष्ठ नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा तथा जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना संधी मिळेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम राहील असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पुन्हा रवींद्र गायकवाड हेच शिवसेनेचे उमदेवार असतील असे सध्या तरी वाटत आहे.

त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्चना ताई विरुद्ध रवी सर असा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या तरी मतदार संघात आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा अर्चनाताई जिद्दी आहेत, त्यांनी जिल्हा परिषदेमध्येही चांगली छाप पाडली आहे. संपूर्ण जिल्ह्यात विकास कामाच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवी गायकवाड यांनी ही संपूर्ण मतदार संघात दौरे सुरु केले आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागलेले पहावयास मिळत आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना ६ लाख ७ हजार ६९९ इतकी मते मिळाली होती . तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांना ३ लाख ७३ हजार ३७४ इतकी मते मिळाली होती. मोदी लाटेत गायकवाड यांनी विक्रमी दोन लाख 34 हजार 325 मतांनी विजय मिळविला होता.

यावेळी मात्र परिस्थती बदलेली आहे. भाजप-शिवसेना युती होणार की नाही हा अद्याप ही निर्णय झालेला नाही. त्यातच भाजप शेतकऱ्यांची असलेलेई नाराजी. काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी आवश्यक सुविधा न दिल्याने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कानशीलात लगावली होती. त्यामुळे गायकवाड यांना ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही.

राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा पत्नी अर्चनाताई पाटील तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्यात सरळ सरळ लढत होणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात जोरात चालू आहे.