‘बेटा बेटा होता है और बाप बाप’; सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

बीड : बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने मतमोजणी घेण्यात आली आहे. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.

दरम्यान या विजयानंतर सुरेश धस यांनी हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय असल्याचं म्हंटलय तसेच ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असं म्हणत धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाना साधलाय. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला. सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झालीये. एका उमेदवाराने नोटाला मतदान केलं.