उस्मानाबादेत भाजपला दे धक्का?, देवानंद रोचकरी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण

osmanabad bjp Leader devanand-rochkari likely to join Shivsena Soon

उस्मानाबाद : राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 16 जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी विविध बैठका घेतल्या. यातच त्यांची भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष देवांनद रोचकरी यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवानंद रोचकरी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्याला उधाण आले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे तुळजापुर येथे दोऱ्यावर होते. यादरम्यान कार्यक्रमासाठी उस्मानाबादला जात असताना त्यांनी वाट वळवुन रचकरी यांच्या कार्यालयाकडे वळवला. तेथे देवानंद रोचकरी यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष म्हणजे मंत्री एकनाथ शिंदे आणि रोचकरी यांच्यात उस्मानाबाद येथील शासकिय विश्रामगृहावर रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत रोचकरी यांच्या शिवसेना प्रवेशावर चर्चा झाली. बैठकीअंती रोचकरी यांना मंगळवारी मुंबईला बोलावण्यात आले आहे. तेथे प्रवेशाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल.

रोचकारी यांच्या जुन्या बसस्थानक समोरील कार्यालयावरील भाजपचे झेंडे, होर्डींग्जही गायब झाले आहेत. यावरून त्यांच्या शिवसेना प्रवेशाला पुष्टी मिळात असल्याची चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या