ऑस्कर पुरस्कार साठी नामांकन मिळालेले चित्रपट

१. ‘अरायव्हल’ (Arrival)

golden-globes-amy-adams-arrival-image-for-inuthपृथ्वीवासीय आणि परग्रहवासीय यांच्यातील संवादाशी निगडित हा सायन्स फिक्शन सिनेमा आहे. या सिनेमात एमी अॅडम्स आणि जेरेमी रेनर हे मुख्य भूमिकेत आहेत.

 

२. ‘फेन्स’ (Fences)

fences-film-golden-globes-2017-image-for-inuth ऑगस्ट विल्सन यांनी लिहलेल्या नाटकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

 

३. ‘मँचेस्टर बाय द सी’ (Manchester By The Sea)

manchester-by-the-sea-film-image-for-inuth

४. ‘हिडन फिगर्स’ (Hidden Figures)hidden-figures-film-image-for-inuthअमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणा-या महिला गणितज्ज्ञ केथरिन जी जॉन्सन, डोरोथी वॉन आणि मेरी जॅक्सन यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. तरॅजी पी हॅन्सन, ऑक्टॅविया स्पेंसर आणि जेनेल मोने यांनी या भूमिका साकारल्या आहेत.

 

५. ‘जॅकी’ (Jackie)

jackie-film-golden-globes-2017-image-for-inuthऑस्करमध्ये नामांकित झालेला आणखी एक चरित्रपट म्हणजे ‘जॅकी’. या चित्रपटाची कथा माजी ‘फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका’ जॅकलीन केनडी यांच्यावर आधारित आहे. सदर चित्रपटात नताली पोर्टमन, पीटर सर्सगार्ड, ग्रेटा गर्वग, बिली क्रुडप यांनी भूमिका साकारल्या आहेत.

 

६. ‘मूनलाइट’ (Moonlight)

moonlight-film-golden-globes-2017-image-for-inuth
मियामीतील गुन्हेगारी जगतात एका व्यक्तीचा जन्मापासून ते विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास दाखविणारा चित्रपट म्हणजे ‘मुनलाइट’.

 

७. ‘लायन’ (Lion)

dev-patel-lion-film-image-for-inuthभारतात हरविलेले लहानपण शोधायला ऑस्ट्रेलियातून निघालेल्या व्यक्तीची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘लायन’. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे.

 

८.  ‘हेल ऑर हाय वॉटर’ (Hell or High Water)

hell-or-high-water-film-image-for-inuth‘हेल ऑर हाय वॉटर’मधील पार्श्वभूमी आर्थिक मंदीला समरूप आहे. दोन भावांची कथा असलेल्या या चित्रपटात एक भावाचा घटस्फोट झालेला दाखविण्यात आला असून दुसरा भावाचा भूतकाळ हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला दाखविण्यात आला आहे. आपल्या कुटुंबाचे पालनपोशन करण्यासाठी हे दोन्ही भाऊ चोरी करतात.

 

९. ‘हॅकसॉ रिज’ (Hacksaw Ridge)

hacksaw-ridge-image-for-inuth
मेल गिब्सनचा ‘हॅकसॉ रिज’ हा हत्यार न उचलता युद्धात उतरणाऱया सैनिकाबद्दलचा चरित्रपट आहे.

You might also like
Comments
Loading...