२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

सोलापूर – (प्रतिनिधी )– श्री सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन आयोजित सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २७ ते ३० जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची माहिती निमंत्रक वीरभद्रेश बसवंती यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवात रविवार २७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत सिद्धेश्‍वर मंदिर येथे रक्तदान शिबिर होणार असून प्रत्येक रक्तदात्यास कृतज्ञता म्हणून हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. सोमवार २८ जानेवारी रोजी सोलापूर शहरातील विविध शाळेमधील ५ वी ते ८ वी विद्यार्थ्यांकरिता हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायं.५ ते ८ या वेळेत शालेय समुहनृत्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी मल्हार अ‍ॅकडमी अमोल देशमुख 9922557500 यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख 24 जानेवारी ही असणार आहे.

मंगळवार 29 जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे मिस अ‍ॅन्ड मिसेस सोलापूर 2019 या फॅशन शो चे आयोजन सायं.5 ते 8 पर्यंत आहे. या स्पर्धेसाठी सनशाईन वेन्चरच्या संजीवनी गायकवाड 87 93314141यांच्याशी संपर्क करावा तसेच बुधवार 30 जानेवारी रोजी श्रमिक पत्रकार संघ व सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सिद्धेश्‍वर यात्रा उत्कृष्ट वृत्तांकन व छायाचित्र स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा व सिद्धेश्‍वर यात्रेतील प्रमुख मानकरी तसेच यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन, एम.एस.ई.बी.पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून करण्यात येणार आहे.

स्मार्ट सोलापूरात शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यात अशा सांस्कृतीक महोत्सवाने सोलापूराचे पर्यटन होण्यास नक्कीच मदत होईल असे महेत्सव अध्यक्ष आनंद मुस्तारे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस समिती अध्यक्ष आनंद मुस्तारे, कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, उपाध्यक्ष रेवणसिद्ध बिज्जीरगी, सचिव विकास कस्तुरे, खजिनदार रवी बिंद्री, मल्लिनाथ साखरे, सुयश खानापुरे संजीवनी गायकवाड आदी उपस्थित होते