पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्टीय लघुचित्रपट ( PCISFF ) महोत्सवाचे आयोजन

टीम महाराष्ट्र देशा : पिंपरी चिंचवड फिल्म क्लब च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्टीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील चित्रपट प्रेमीं तरुणांना हक्काचे व्यासपीठ पिंपरी चिंचवड फिल्म क्लब च्या वतीने या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे, त्यानिमीत्ताने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व चित्रपट प्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुचित्रपट पाहण्यास मिळणार आहेत.

Loading...

तसेच या महोत्सवा दरम्यान चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणार असून चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, हा आंतरराष्टीय लघुचित्रपट महोत्सव दिनांक १६ आणि १७ मार्च २०१९ रोजी पिंपरी चिंचवड शहरात पार पडणार असून त्या बाबतची अधिक माहिती महोत्सवाची वेबसाईट http://www.pimprichinchwadisff.com वर उपलध आहे.
अशी माहिती महोत्सवाचे डायरेक्टर आणि पिंपरी चिंचवड फिल्म क्लबचे संचालक मा.अविनाश कांबीकर आणि दत्त गुंड यांनी या वेळी दिली.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...