सक्षम २०२१ अंतर्गत संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन

Saksham-

औरंगाबाद : पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हरित आणि स्वच्छ ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. १५ फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

ऊर्जा सुरक्षा, शास्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण या साठी भारत सरकारच्या वतीनं या हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालने, परकीय चलनाचे वाढते ओझे कमी करणे, जीवाश्म इंधनावरील ज्वाळणामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचं रक्षण करण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पेट्रोल पंप, गॅस एजन्सीज आदी ठिकाणी तसेच विविध कार्यशाळांमधून चर्चा करण्यात येणार आहे. यात राज्यात २४ विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या