इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी तर्फे स्तनपान सप्ताहाचे आयोजन

टीम महाराष्ट्र देशा :  १ ऑगस्ट २०१८ रोजी जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त बाबा आनंद मंगल कार्यालय धावडे वस्ती भोसरी येथे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी भोसरी विभाग २ च्या मुख्य सेविका सौ. सुनंदा हांगे इअर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या प्रेसींंडर मनीषा समर्थ सेक्रेटरी आनंदिता मॅॅडम शालिनी प्रो.प्रा. सौ राजश्री लांडगे सौ मेमाने ताई आशा वर्कर सौ सुष्मा रासकर उपस्थित होत्या. व विभागातील सर्व सेविका मदतनीस उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ हंगे मॅडम यांनी केले सूत्रसंचालन नंदा ओव्हाळ तसेच नियोजन अनिता आवळे यांनी केले. इतर क्लब मार्फत गर्भवती माता व स्तनदा मातांना कापडी बॅॅग पौष्टिक लाडू तसेच अल्पहार देण्यात आला. तसेच शतावरी क्लब चे वाटप करण्यात आले.तसेच स्तनपान विषयी माहिती व स्तनपानाचे महत्व सांगितले.

 

पुस्तकी ज्ञानाबरोबर कलेला द्या प्राधान्य : आ.प्रणिती शिंदे

 

You might also like
Comments
Loading...