पिंपरी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Organizing an employment fair at Pimpri

पुणे : खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना मनुष्यबळ त्वरीत मिळवुन देण्यासाठी तसेच उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पिंपरी आणि सिहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे, सिहगड इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड कॉमप्युटर ॲप्लीकेशन पुणे-मुंबई हायवे नर्ऱ्हे आंबेगाव व सॉप्टझिल टेक्नॉलजिस प्रा.लि डेक्कन, पुणे यांच्या संयुकत विद्यमाने गुरुवार 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सिहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे, सिहगड इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट ऍ़न्ड कॉमप्युटर ऍ़प्लीकेशन पुणे-मुंबई हायवे नर्ऱ्हे आंबेगाव, पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मेळाव्यासाठी  नामांकित उद्योजक सहभागी होणार असून विविध प्रकाराची रिक्तपदे रोजगार मेळाव्यासाठी नोंदविण्यात आलेली आहेत. या मेळाव्यात कंपन्यांकडुन उमेदवारांच्या जागेवरच मुलाखती घेऊन उमेदवारांना  निवडीची संधी  उपलब्ध होणार आहे. तसेच उद्योजकांना त्यांचेकडील रिक्तपदे तातडीने भरणे सोईचे होणार आहे. या रोजगार मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ठय असे आहे की, या रोजगार मेळाव्यात ज्या उमेदवारांनी एम्प्लॉयमेंटचे कार्ड काढलेले नाही अशा  उमेदवाराला ऑनलाईन नविन कार्ड काढण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वि.वि.कानिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.