अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांसाठीच्या परिषदेचे आयोजन

पुणे – अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांची क्षमता उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय(एनएसआयसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की)यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेचे उदघाटन येत्या गुरुवारी १ फेब्रुवारीला उद्योग आणि खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. अल्पबचत सांस्कृतिक भवन येथे सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम पार पडेल. सध्याच्या एससी / एसटी आणि तळागाळातल्या उद्योजकांना एकत्र आणून यशस्वी व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हा या परिषदेमागील मुख्य उद्देश आहे.

हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी होणार होता पण महाराष्ट्र बंद असल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.