fbpx

शिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित

सोलापूर( प्रतिनिधी ) – शिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर – मॉम्स आयोजित खास महिलांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षा शीतलादेवी मोहिते-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

२५ वर्षांपुढील महिलांना आपल्या अंगीभूत कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी या स्पर्धा भरविण्यात येणार असून विभागनिहाय प्रत्येक स्पर्धेतून प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांची महाअंतिम स्पर्धा १६ फेब्रुवारी व १७ फेब्रुवारी रोजी अकलूज येथे होणार आहे.

सोलापूर शहरातील महिलांसाठी २०,२७ जानेवारी आणि ३ फेब्रुवारी रोजी सलग तीन रविवारी सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्रशाला येथे होतील. दोरीवरील उडी, धावणे, लंगडी, लिंबू चमचा, जनरल नॉलेज टेस्ट, रांगोळी, पॉट पेंटिंग, मेकअप , मेहंदी, विणकाम, वक्तृत्व, सोलो डान्स, फॅन्सी ड्रेस, समूह नृत्य, फॅशन शो आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.