औरंगाबाद : पीकनुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका असा इशारा देत आमदार प्रशांत बंब यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरले. खुलताबाद तालुक्यातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.१८) घेण्यात आलेली आमसभा अतिवृष्टी अन महावितरणच्या कारभारावरुन वादळी ठरली. तालुक्यातील तलाठ्यांना आमदार प्रशांत बंब यांनी चांगलेच फैलावर घेतले. टाकळी राजाराय येथील तलाठ्यास निलंबित केल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. खुलताबाद येथील फुलंब्री रोडवरील यशोदा लॉन्सवर आमदार बंब यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आमसभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
तालुक्यात ८ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ३४ हजार हेक्टरपैकी २२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. ऊस, अद्रक, भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे नव्याने पंचनामे करण्याचे, शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी पीक कापणी अहवाल तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
आमसभेत अतिवृष्टी बाबतचा अहवाल तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी तर मागील आमसभेचा अहवाल गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी सादर केला. या आमसभेला जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, पंचायत समिती सभापती गणेश नाना आधाने, पंचायत समिती उपसभापती युवराज ठेंगडे आदींसह अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
- ‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
- फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
- ‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री फिक्स…!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<