ऐकावं ते नवलंच ! दुसऱ्या वर्षांपासून खात होती केस, ऑपरेशननंतर डॉक्टरही झाले अवाक

doctor

मुंबई : लहान मुलांकडे पालकांचे लक्ष नसेल तर ते काहीही तोंडात घालतात आणि अशातच काहींना त्याची सवयही लागून जाते. कल्याणमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका मुलीला केस खाण्याची सवय होती. 12 वर्षाय मुलीच्या पोटातून तब्बल 650 ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून केस खाण्याची सवय होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असे म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सुटावी म्हणून अनेक प्रयत्न केले मात्र तिची ही सवय सुटली नाही. गेल्या आठवड्यात तिच्या पोटात अचानक दुखु लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले.

तिला रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा तिचे वजन फक्त 20 किलो एवढंच होतं. सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस अडकल्याचे दिसून आले. मागील गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवणही जात नसल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. अखेर हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. पण केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती. म्हणूनच डॉक्टरांनी ओपन सर्जरीचा मार्ग निवडला गेला आणि भला मोठा केसाचा गोळा मुलीच्या पोटातून काढण्यात त्यांना यश मिळालं. या शस्त्रक्रियेनंतर ती सुखरुप असून तिला जेवताना पाहून पालकही खूश आहेत.

महत्वाच्या बातम्या