निवडणूक मतदान केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत नियोजन करण्याचे आदेश 

vote

कोल्हापूर  : पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी. प्रत्येक मतदान केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे, याबाबत कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.

पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पूर्व तयारी व नियोजनाबाबत सर्व नोडल अधिकाऱ्यांची आज जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षदा वेदक, जि.प.चे मुख्य व लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने आदी उपस्थित होते.

कायदा व सुव्यस्थेबाबत आढावा घेवून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, व्हिडीओ पथक नेमल्याबाबत तहसिलदार प्रातांधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात यावा. परवानगी घेवून मेळावे होतात का याबाबत तपासणी करावी. मतदान केंद्रावर लागणारे मनुष्यबळ आणि वाहने याबाबत नियोजन करावे. हे करताना सामाजिक अंतर राखले जाईल यावर भर द्यावा. मतदान केंद्रावर आरोग्य सेवकांची नेमणूक करून त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण द्यावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखले जाईल, याबाबत सूचना द्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या