जखमी लेखाधिकाऱ्याला 77 लाख 9 टक्के व्याजासह भरपाई देण्याचे आदेश

Court

औरंगाबाद : विरुद्ध दिशेने आलेल्या कारच्या धडकेने दुचाकीवरील खासगी कंपनीत कार्यरत वरिष्ठ लेखाधिकाऱ्यास 80 टक्के अपंगत्व आले. त्यामुळे नाेकरीही गमवावी लागली असून त्यांना नुकसान भरपाई म्हणून 77 लाख 43 हजार 696 रुपये 9 टक्के व्याजाने रक्कम देण्याचे आदेश औरंगाबादच्या माेटार प्राधिकरणाने दिले आहेत.

या प्रकरणात प्रशांत सुखदेव काळे हे गंभीर जखमी झाले हाेते. अहमदनगरमधील एक्ससाईड इंडस्ट्रिजमध्य ते वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. 9 नाेव्हेंबर 2015 राेजी काळे हे नाेकरीवरील कर्तव्य बजावून दुचाकीवरून जात असताना केडगाव बायपास ते कल्याण राेडवर एका इनाेव्हा कारने (क्र. एमएच-24-एफ-3540) जाेराची धडक दिली.

या अपघातात प्रशांत काळे यांना 80 टक्के अपंगत्व आले व पाठीच्या मणकयास मारही लागला. शिवाय त्यांना नाेकरीही गमवावी लागली. या अपघातप्रकरणी दिलीप मारुती काळे यांच्या फिर्यादीवरून अहमदनगरच्या काेतवाली पाेलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला.

नुकसान भरपाईसाठी प्रशांत काळे यांनी अॅड संदीप राजेभाेसले यांच्यामार्फत कारचालक, मालक, दी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीविराेधात औरंगाबादच्या माेटार न्यायधिकरणात अर्ज दाखल केला. न्यायधिकरणाचे सदस्य ए. आर. कुरेशी यांनी जखमी प्रशांत काळे यांना 77 लाख 43 हजार 696 रुपये प्रतिवादींनी एकत्रित व संयुक्तरीत्या 9 टक्के व्याजासह द्यावेत, असा आदेश दिला.

महत्त्वाच्या बातम्या