कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश

kangan

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौत नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडते. कंगणा तिच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.

दरम्यान अभिनेत्रीकंगणा आता अजून एका अडचणीत सापडली आहे.  वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर  दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

प्रकरणी कंगणाची चौकशी केली जाणार आहे कंगणाचे ट्विटर कोण चालवते? का कंगणा स्वतः ट्विट करते, या बाबत आता चौकशी केली जाणार आहे. कंगणा सोबत  बहिण रंगोली हिची देखील चौकशी केली जाणार आहे.  याआधी देखील शेतकऱ्यांचा अवमान केल्याप्रकरणी कंगणा विरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल केला गेला.

महत्वाच्या बातम्या-