चंद्रकांत खैरे यांना ‘मुख्य प्रतोद प्रमुख’ पदाचा राजीनामा देण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरच्या लोकसभेतील अविश्वास ठरावादरम्यान शिवसेनेतही अनेक घडामोडी घडत आहेत. मोदी सरकारच्या बाजूनं पक्षातील मतदान करण्याचा व्हीप खासदारांना जारी केल्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना ‘चीफ व्हीप’ अर्थात ‘मुख्य प्रतोद प्रमुख’ पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिला आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषदही घेणार आहेत.

न्यूज एजन्सी एएनआयनं गुरुवारी शिवसेनेनं आपल्या खासदारांसाठी एक व्हिप जारी केल्याचं म्हटलं होतं… यामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूनचं मतदान करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. खैरेंनी हा निर्णय कुणाला विचारून घेतला होता? किंवा पक्षातील वरिष्ठांशी चर्चा न करताच खैरेंनी हा निर्णय घेतला होता का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

दरम्यान,नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुनं मतदान करण्याबद्दलचा कोणताही व्हिप आपल्याकडून जारी करण्यात आला नव्हता… हा आपल्या नावानं कुणी तरी खोडसाळपणा केलाय… शिवसेनेकडून कोणताही व्हिप जारी करण्यात आलेला नव्हता… जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आज सकाळीच जाहीर झाला, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार आणि मुख्य प्रतोद प्रमुख चंद्रकांत खैरे यांनी एका वाहिनीशी बोलताना दिलंय.
आज अविश्वास ठरावादरम्यान चर्चेवर बहिष्कार टाकण्याचे आदेश खासदारांना वरिष्ठांकडून देण्यात आलेत. या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात किंवा बाजूनं शिवसेना मतदान करणार नाही.

‘मराठी अभिमान गीता’तील कडवं वगळल्याचा अजित पवारांचा आरोप

‘मुख्यमंत्री कोण ? हे बसून ठरवूया! अन्यथा युतीतील भांडणात राष्ट्रवादीचा फायदा’

 

You might also like
Comments
Loading...