श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अहमदनगर: नगर महापौरपदाच्या निवडणुकीवेळी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने शिवसेनेला मतदान केले म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी छिंदमला चांगला चोप दिला. त्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपने केलेल्या घोडे बाजारामुळे शिवसेनेला अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर रहाव लागणार आहे. मात्र, सत्ता सोडू पण शिवद्रोही छिंदमचे मतदान नकोचा निर्णय घेत पक्षाला छिंदमचे मतदान मिळाल्यास ते बाद समजावे असा अर्ज सेनेकडून देण्यात आला होता. दरम्यान, शिवसेनेकडून नकार देवूनही पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याने सेना नगरसेवकांनी श्रीपाद छिंदमला मारहाण केली आहे.