fbpx

घाटकोपर विमान दुर्घटनास्थळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : घाटकोपर परिसरात विमान कोसळलेल्या दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. ही दुर्घटना दुर्दैवी आहे. नागरी हवाई उड्डाण संचालनालयासह संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क केले आहे. केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्र्यांनीही दुर्घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

घाटकोपर भटवाडी येथील रहिवाशी परिसरात बांधकामाधीन ठिकाणी आज विमान कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क केले. त्यानंतर दुपारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळावरील मदत कार्याची माहितीही घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रहिवाशी क्षेत्रात विमान कोसळल्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. दुर्घटनेतील बाधितांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार राम कदम, मोहम्मद आरिफ नसीम खान, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच मदत कार्यावरील अग्निशमन, विविध दलांचे अधिकारी उपस्थित होते.

‘महानेट’साठी खाजगी नेटवर्कच्या वापराची सूचना – देवेंद्र फडणवीस

सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – मुख्यमंत्री

जाहिरातीमध्ये मॉडेल न वापरता खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. – मुख्यमंत्री

4 Comments

Click here to post a comment