मुंबई: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मुंबई विभागाच्या वेधशाळेने हि शक्यता वर्तवलेली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, आणि सातारा या भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
त्यानुसार २८ जुलै रोजी हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला यलो ॲलर्ट दिला आहे. तर, २९ जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या भागात मुसळधार पावसाने अगोदरच धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी दरड दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले आहेत. आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवल्याने या जिल्ह्यांच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे कळते. याबाबत हवामानाची अधिक माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी समाज माध्यमावर दिली आहे.
27/7, Severe weather warning issued by IMD for 27-31 July for Maharashtra, indicates possibilities of enhancement of rainfall activity on Fri & Sat (30,31Jul) over entire konkan including Mumbai, Thane,Ratnagiri,Sindhudurg,Pune Kolhapur,Satara.
For details pl watch IMD Update pic.twitter.com/N7eCwLBD8G— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2021
एकीकडे पश्चिम महाराष्ट्रावर पावसाचे अवकाळी संकट आहे. तर मराठवाड्यात अजूनही जेमतेम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पदक जिंकल तर भारतीय अन्यथा…’, मिलिंदच्या पत्नीने व्यक्त केली भावना
- महाराष्ट्राचा विक्रम, ३ कोटी नागरिक ठरले पहिल्या लसीचे लाभार्थी – राजेश टोपे
- धक्कादायक; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची गाडी पलटली
- क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक बातमी : ‘या’ भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण; आजचा सामना पुढे ढकलला
- ‘तळीये’चे दुख: ‘माळीण’ने जाणले ; मदतीसाठी केला एक हात पुढे