नाणार प्रकल्पाला विरोध, विधानसभेत नितेश राणे-प्रताप सरनाईक आक्रमक

नागपूर : विधानसभेत नाणार प्रकल्पावरुन आज मोठा गदारोळ झाला. नाणार प्रकल्पाला विरोध करत विधानसभा अध्यक्षांच्या समोरुन आमदार नितेश राणे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेसह इतरही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. आमदार नितेश राणे या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मंगळवारी नाणार प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. तर शिवसेनेने सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली असून विरोधकांनीही नाणार प्रकल्पावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

कोकणात ‘नाणार’ प्रकल्प होणारचं – फडणवीस

नाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

You might also like
Comments
Loading...