पद्मावती वर सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला राजघराण्यातील सदस्यांचा विरोध

पद्मावती चित्रपटासंदर्भात वाद सुटता सुटेना

टीम महाराष्ट्र देशा: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट पद्मावती वर सुरु असलेला वाद न संपण्याच्या वाटेवर आहे. नुकतीच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवली असली तरी पूर्व मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी सेंसॉर बोर्ड अत्यंत बेजबाबदार असल्याचं सांगत सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

पद्मावती चित्रपटासंदर्भात सेन्सॉर बोर्डाने सहा सदस्यांची समिती गठीत केली होती. त्यामुळे विश्वराज सिंह यांना सुद्धा बोलवण्यात आले होते. मात्र एका दुसऱ्याच समितीने चित्रपट पाहून मंजुरी दिली असल्याचा आरोप विश्वराज सिंह यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, चित्रपटाचे नाव बदलणे हा निव्वळ देखावा असून आमची कोणतीही समंती न घेता चित्रपटाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. सदर चित्रपट माझ्या पूर्वजांवर आधारित असून थोडेफार बदल केले, तरी चित्रपटात ऐतिहासिक जागा आणि पूर्वज दाखवले असल्याचं तथ्य बदलणार नाही. चित्रपटातील व्यक्तिरेखांची नावंही तीच आहेत.

You might also like
Comments
Loading...