मोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं. मात्र त्यानंतर ओबीसी समाजाने त्याला कडाडून विरोध केला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट संघर्ष आता पाहायला मिळत असतानाच, त्यामध्ये नवी माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणावरुन मागासवर्ग आयोगातील सदस्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.

मागासवर्ग आयोगाच्या 9 पैकी 4 सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचं समजतंय. या चारही सदस्यांचा मराठ्यांना OBC दर्जा देण्यास विरोध असल्याची माहिती सूत्रांनी tv9 ला दिली. तर उर्वरित 5 सदस्यांनी मराठा आरक्षणाची शिफारस केली. त्यामुळे 5 विरुद्ध 4 मतांनी मराठ्यांच्या आरक्षणाची शिफारस करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठे हे क्षत्रीय, राजकीय आणि सर्वात मोठे जमीनदार आहेत. त्यामुळे त्यांना ओबीसी दर्जा देण्यास 4 सदस्यांचा विरोध असल्याचं समजतंय. अंतिम क्षणी मात्र अहवालावर सर्वांच्याच स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामुळे या चार सदस्यांनी दबावातून स्वाक्षऱ्या केल्या का असा प्रश्न आहे.

Rohan Deshmukh

ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध

मोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द

Latur Advt
You might also like
Comments
Loading...